vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी माका)- पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसरात असणारे फार्म हाउस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर दि.१२ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३(१) व (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम इ. च्या आयोजक, मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्स याचा वापर करु नये. कारण अशा वापर केल्यामुळे पायलटच्या दृष्यात अडथळा निर्माण होऊन लॅंडीग व टेकऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन· जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान..

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

ब्रेकिंग न्यूज:-,आमदार योगेश दादा कदम यांच्या गाडीला अपघात**सुदैवाने आमदार सुखरूप…

भारतीय नौदल दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील खास व्हिडीओ नेव्ही  कडून जारी; सिंधुदुर्गात आज सेलिब्रेशन…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील लातूर येथे विकासमूर्ती आ. श्री. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते 2025 वर्षांच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न… 🎉

vishwatmaklokswamivarta

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजोपयोगी ठरावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta