vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुस्लिम नुमाइंदा काउन्सिल च्या बेमुदत साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा पाठिंबा,उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित दादा पवार यांना भेटून लवकर रामगिरी बाबा अटक करण्याची मागणी करणार

मुस्लिम नुमाइंदा काउन्सिल च्या बेमुदत साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा पाठिंबा,उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित दादा पवार यांना भेटून लवकर रामगिरी बाबा अटक करण्याची मागणी करणार

 

 

 

छत्रपती संभाजीनगर: मित्र पक्षाचे आमदारांनी एका समाजाला टारगेट करण्याच्या प्रयत्न करत आहेत ते आम्ही खपून घेतले जाणार नाही असे ट्विट करून अजित पवार यांनी इशारा दिला आहे.मुस्लिम नुमाइंदा काउन्सिल च्या बेमुदत साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा पाठिंबा दिला आहे.

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित दादा पवार यांना भेटून लवकर रामगिरी बाबा अटक करण्याची मागणी करणार आहे.

हिंदू मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुशित करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने सर्व समाजाला शांतीच्या संदेश देणारे जागाचे प्रॉफिट मोहम्मंद पैंगबर यांची प्रतिमा मलीन होईल, असे जाणिवपूर्वक प्रवचन करुन रामगीरी गुरु नारायण गिरी या ढोंगी महाराजांचा वक्तव्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होईल आणि वातावरण कलुषित होण्याचे प्रमाण वाढले आहे यांच्यावर ७२ गुन्हे fir होऊनही अटक होत नाही म्हणून मागील १८ दिवसांपासून छ.संभाजीनर औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय समोर (Muslim Numainda Concil यांचा वतीने उपोषण सुरू आहे आज या आंदोलनात समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत दादा पवार मित्र परिवार सोबत उपस्थित राहुन पाठिंबा पत्र दिले

 

. सलोख्याने राहून गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या लोकांमध्ये विष कालवण्याचा अधिकार कोणालाही नाही.तसे होत असल्यास आम्ही तो होऊ देणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहू.

 

मुस्लिम नुमाइंदा काउन्सिल च्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे,मागील १८ दिवसांपासून हे साखळी उपोषण चालू आहे.मुस्लिम समाजाच्या मागण्या व भावना प्रशासनासमोर निवेदनाद्वारे मांडण्यात आलेल्या आहेत परंतु शासन या बाबत गांभीर्याने दखल घेत नाही करीता मुस्लिम नुमाइंदा काउन्सिल च्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे,याची तात्काळ दखल घेऊन खालील प्रमाणे मागण्या आहेत.

१)रामगिरी गुरू नारायण याला तात्काळ अटक करा

२) नितेश राणे याला तात्काळ अटक करा

३) वक्फ बोर्ड अधिनियम दुरुस्ती कायदा रद्द करा

४) ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव पुर्वरत करून नवीन शहराला छत्रपती संभाजीनगर नाव द्या.

या सर्व मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस,आमेर जेतपुरवाला शहर जिल्हा कार्याध्यक्ष शेख कय्युम अहमद,अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष असद पटेल, मध्य वि. युवक अध्यक्ष झुबरे खान शहर उपाध्यक्ष, बादशहा अन्सारी ,शहर सचिव झाहेद अलकेसरी, शहर सरचिटणीस आयाज खान, सोशल मीडिया शहर जिल्हा अध्यक्ष ऊमर सौदागर ,सचिन इंगळे व सहकारी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात २४ लाखावर मतदार बजावणार मतदानाचा हक्क जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची माहिती

भूसंपदा क्षेत्रीय गटाचे सर्वेक्ष न नागरिकांनी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

सहकारी उपसा जलसिंचन योजनांची थकबाकी बँकांनी वसुली करू नये- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

महाराष्ट्र राज्यात नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा २०२४-राखीव निकालांची सुनावणी दि.२५ पासुन