vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

जालना विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन भास्कर अंबेकर यांना उमेदवारीदेण्याची शिवसेना पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

जालना विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन भास्कर अंबेकर यांना उमेदवारीदेण्याची शिवसेना पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

 

जालना, दप्रतिनिधी)-जालना विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख हरिहर शिंदे यांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांची मुंबई येथील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. जालना विधानसभेत आजपर्यंत चार वेळा शिवसेना पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. जालना नगर रिषदेतही गेली अनेक वर्षे शिवसेनेचाच झेंडा होता. त्यामुळे या मतदार संघात पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे. जालना मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात लोकसभेला काँग्रेसला सुटल्याने जालना विधानसभेची जागा शिवसेनेला सोडवून घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.

भास्कर अंबेकर हे गेली ३८ वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून

कार्यरत आहेत. पक्षाच्या फुटी नंतरही ते शिवसेनेतच राहिले. अनेकविध

पक्षांनी त्यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देऊ केली असतानाही

पक्षनिष्ठा न सोडता त्यांनी शिवसेनेतच काम केले.

शिवसेनेचे शहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख व गेल्या पंधरा वर्षांपासून

जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी संघटना मजबूत केली. जालना नगरपरिषदेमध्ये

अनेकवेळा नगरसेवक, दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून काम केले. आपल्या

नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विकास कामे केल्याने

शहरवासीयांना त्यांची कारकीर्द कायम संस्मरणीय आहे. त्यांचा दांडगा

जनसंपर्क व सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या दृष्टीमुळे ते लोकप्रिय आहेत.

जालना बाजार समितीतही ते सोळा वर्षे संचालक व उपसभापती म्हणूनही त्यांनी

काम केले .खरंतर त्यांना खूप वर्षांपूर्वीच विधानसभेची संधी मिळायला

पाहिजे होती.

आता तरी जालना विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख

भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्यावी. अशी जोरदार मागणी उद्धवजी

यांच्याकडे शिष्टमंडळांने केली.

या शिष्टमंडळात तालुकाप्रमुख हरिहर शिंदे यांच्यासह माजी जिल्हा परिषद

सदस्य बबनराव खरात, माजी पं. स. सभापती मुरलीआबा थेटे, माजी जि.प. सभापती

देवनाथ जाधव, विधानसभा संघटक दीपक रणनवरे, शहरप्रमुख बाला परदेशी,

घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, उपतालुका प्रमुख प्रभाकर उगले,

हरिभाऊ शेळके, प्रभाकर घडलिंग, अंकुशराव राजेजाधव, माजी जि.प.सदस्य अशोक

खलसे, युवा सेनेचे संदीप मगर, परमेश्वर डोंगरे, संतोष खरात, बळीराम ढवळे,सुरेश वाघमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

उपविभाग भामरागड : फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

vishwatmaklokswamivarta

सिंदखेडराजा तालुक्यात प्रशासन गाँव की ओर मोहीमेंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत हनुमान चालिसा आणि भोंगे प्रकरणातून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न, यामध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं तपासातून समोर येतंय, सेना नेते संजय राऊत

कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी..

विधानसभा निवडणूक2024: पूर्व विदर्भातल्या 28 पैकी 14 जागांवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा; उद्धव ठाकरेंचे मिशन विदर्भ?

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta