vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी..

कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी..

             सांगली, प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वाढवलेला विसर्ग दि. 21 ऑगस्ट रोजी कमी करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी २१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ७ फुटांवरून ४ फूट ६ इंचांपर्यंत खाली आणून ३४,६०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ३६,७०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी झाल्याने जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा विसर्ग धरणातून दिनांक 21/08/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता बंद करून वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत व विद्युत गृहातून 1630 क्युसेक विसर्ग कायम ठेऊन वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगून दोन्ही धरण व्यवस्थापनांकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

00000

संबंधित पोस्ट

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे हीच खरी सुरक्षितता – गडचिरोली पोलिस

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी…

vishwatmaklokswamivarta

दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी ; कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर 

कुचीत विकसित कृषि संकल्प अभियान उत्साहात संपन्न

विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी नागरिकांनी विविध विषयांवर आपले मत द्याव

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार