vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांसाठीपंतप्रधान शिष्यवृत्ती योजना 2024-25

माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांसाठीपंतप्रधान शिष्यवृत्ती योजना 2024-25

 

 

ठाणे, प्रतिनिधी :- माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इ.12 वी, डिप्लोमा व पदवी परीक्षेमध्ये किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत व त्यांनी Engineering, B.Tech, MBBS, BDS, B.Ed, BBA, B.Pharm, BCA, MBA व MCA इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, अशा पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

 

पंतप्रधान शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमाची यादी www.ksb.gov.in या website वर उपलब्ध असून शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. हे अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संबंधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज दि. 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.

 

अर्ज भरण्यापूर्वी लाभार्थ्यांनी वेबसाईटवर देण्यात आलेल्या Annexure-1,2,3 च्या प्रती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कॉलेजचे Vice Chancellor/Principal/Vice Principal/Dean/Associate Dean/Registrar/Dy. Registrar व बँक मॅनेजर यांची स्वाक्षरी घेवून सोबत ठेवावेत.

 

सर्व लाभार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती घेवून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणीकरीता उपस्थित राहावे, संपर्कासाठी फोन नंबर- ०२०-२५३४३१७४/९९२००१६५८० आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी कळविले आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून माघारी साठी,क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या वांद्रे येथील घराबाहेर प्रहार संघटनेचे जोरदार निदर्शने करण्यात आली

पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देवी मुर्ती विसर्जन कालावधीत घाणेवाडी तलावाजवळ प्रतिबंधात्मक आदेश लागु 

vishwatmaklokswamivarta

माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार

vishwatmaklokswamivarta

सुवर्णकारांनी अमित ठाकरेच्या पाठिशी उभे राहावे – नंदकिशोर तळावडेकर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार सेना

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश*