
समृद्धी’च्या सभासदांची दिवाळी होणार गोड-कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांची १०० रुपये वाढीव हप्त्याची घोषणा
राज्य प्रतिनिधी घनसावंगी : समृद्धी साखर कारखान्याच्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळीत हंगाम २०२३-२४ मधील गाळप झालेल्या उसाचा पहिला २८०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे देण्यात आला. आता दिवाळी सणानिमित्त कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी १०० रुपये प्रती मे टन प्रमाणे वाढीव हप्ता देण्याची घोषणा केली आहे.हा वाढीव हप्ता दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी मंगळवारी (दि.१७) दिली आहे.
शेतकऱ्यांच्या उसाला समृद्धी कारखाना उच्चांकी भाव देत असल्याने शेतकरी आनंदी आहेत. उच्चांकी भावाची परंपरा यंदाही ‘समृद्धी’ने कायम ठेवली असून पहिला हप्ता २ हजार ८०० रुपये प्रतीटन प्रमाणे दिल्यानंतर दिवाळी सणासाठी १०० रुपयाचा वाढीव हप्ता देण्याचा निर्णय सतीश घाटगे यांनी जाहीर केला आहे.
प्रतिक्रिया
कपाशी, सोयाबीन या पिकाचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून हातात पैसा आला नाही. आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी समृद्धीने १०० रुपयाचा वाढीव हप्ता देण्याचा निर्णय घेतला. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.
सतीश घाटगे , चेअरमन, समृद्धी शुगर्स



