
समाजवादी पार्टी महाविकास आघाडी सोबत लढणार महाराष्ट्रात बारा जागेवर…
राजकीय प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका-2024, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सोबत समाजवादी पार्टी राज्यातील 12 जागा विधानसभेच्या लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे समाजवादी पार्टीचे प्रमुख अध्यक्ष अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर असून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांचा दौरा सुरू आहे या दरम्यान त्यांनी पत्रकारांना माहिती देत असताना सांगितले की महाविकास आघाडी बरोबर युती करून आम्ही बारा जागा लढवणार आहोत
महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. राज्यात मविआचा जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आता सपा 12 जागांवर लढणार असल्याची माहिती अखिलेश यादव यांनी दिली आहे. सध्या महाराष्ट्र दौर्यावर असलेल्या अखिलेश यांनी धुळे मध्ये बोलताना ही माहिती दिली आहे. काही जागांवर सपा कडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत



