vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अखिल भारतीय ओबीसी एकता परिषद जिल्ह्यातील पाचही विधानसभा लढणार -बाबासाहेब वानखेडे जालन्यात  बैठक, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

अखिल भारतीय ओबीसी एकता परिषद जिल्ह्यातील पाचही विधानसभा लढणार -बाबासाहेब वानखेडे जालन्यात  बैठक, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

जालना/प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी अखिल भारतीय ओबीसी एकता परिषद आता विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. जिल्ह्यातील जालना, परतुर-मंठा, भोकरदन, घनसावंगी मतदार संघात स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहे. तर बदनापुर- अंबड विधानसभा मतदार संघ राखीव असल्यामुळे येथे राखीव उमेदवाराला पाठींबा देणार आहेत. या निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर उद्या 20 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 12.30 वाजता नुतनवसाहत अंबड रोड, फ्रेन्डस्‌‍ कॅपिटल समोर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस ओबीसी समाजातील सर्व पिवळे झेंडे एकत्र यावे हाच उद्देश आहे. ओबीसी समाजातील महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी व ओबीसी , एससी, एसटी, व्हिजीएनटी भटक्या विमुक्त समाजाने बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे, सुरेश रत्नपारखे, देविदास घुले, रंगनाथ चांदणे, कडुबा वाकीकर, महेंद्र शिंदे, शेख अकील, ॲड.अरशद बागवान, ॲड. रामेश्‍वर खांडेभराड, सचिन वानखेडे, नितीन तायडे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

दुष्काळी स्थितीच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी डुडी यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग*शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम,निवडणूक प्रक्रियेतील यश सामुहिकप्रयत्नांमुळेच- विभागीय आयुक्त दिलीप गावडे

vishwatmaklokswamivarta

सहकार महर्षि बाळासाहेब पवार यांचा 26 व्या पुण्यतिथी निमित्त जालना शाहरातील काद्राबाद येथील जैस्वाल हेल्थ केअर येथे मोफत दंत रोग शिबिर.

vishwatmaklokswamivarta

*वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पास भेट देत प्रधान सचिव श्रीम.अंशू सिन्हा यांनी व्यक्त केले समाधान**कपड्याच्या कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणारा अभिनव प्रकल्प देशात पहिल्यांदाच नवी मुंबईत

प्रशासनाने नागरिकांच्या कल्याणासाठी अविरत सेवा द्यावी – प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

vishwatmaklokswamivarta