vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 

 

           जालना, प्रतिनिधी:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

 

संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

vishwatmaklokswamivarta

राज्यातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू

पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

तेलंगणात सुरक्षा वाढ, आमदारांना हलवण्यासाठी काँग्रेसने हैदराबादमध्ये बसेसची व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

आजची मोठी बातमी :नगरविकास विभाग नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे बंदी आदेश जारी