vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड येथे स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम

स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम

 

नांदेड प्रतिनिधी:- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम घेतले जात आहेत. भोकरमध्ये स्वीप अंतर्गत तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली आणि मतदानासाठी स्वाक्षरी मोहीम तसेच सेल्फी काढून या उपक्रमात सहभाग नोंदवला.

भोकरमध्ये मतदार जागृतीच्या दृष्टीने आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात तृतीयपंथी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यांनी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेतला आणि मतदान करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाद्वारे तृतीयपंथी मतदारांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

 

यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांनी मतदानाच्या प्रक्रियेतील पारदर्शकता व जबाबदारी या विषयी माहिती दिली. यावेळी सुमन गोणारकर यांनी मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

या कार्यक्रमाने तृतीयपंथी मतदारामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. या कार्यक्रमामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जकियोद्यीन शेख, मिलिंद जाधव, सुधांशु कांबळे आदींची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान…

विधान परिषद प्रश्नोत्तरे :उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी- मंत्री उदय सामंत

रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा- विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !बिनशर्त माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा – सनातन संस्थेचा पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा..

सणासुदीच्या काळात केंद्राकडून एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार

नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्याचा जाहीर निषेध – संगीताताई गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta