vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे भावनिक आव्हान

 मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे भावनिक आव्हान

 

[ राजकीय प्रतिनिधी]

मराठा आंदोलनासाठी आवाज उचलणारे महाराष्ट्र राज्यातील तरुण तडफदार नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक येथील लासलगाव येथे एका सभेत असे भावनिक आव्हान केले की मी थोडा दिवसाचा पाहुणा आहे माझे शरीर आता मला साथ देत नाही तुम्हाला हात जोडून विनंती आहे की समाजाचा लढा अर्धवट राहू नये मला प्रत्येक आठ दिवसांनी सलाईन लावावी लागते आहे मी तुम्हाला सांगतोय कारण शरीर हे कधीही जाईल काही सांगता येत नाही अशा भावनिक आव्हानामुळे सभेसाठी जमलेल्या मराठा आंदोलनातील कार्यकर्ते नागरिक भावूक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल नाशिकमधील लासलगाव येथे केलेल्या एका विधानामुळे मराठा आंदोलक भावूक झाले आहेत

वर्षभरापासून मराठा आरक्षण आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे त्यांची प्रखर भूमिका बजावली आहे. नाशिकमधील लासलगाव येथे मराठा आंदोलकांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर आता मला साथ देत नाही. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये. माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये. मला आठ दिवसांनी, पंधरा दिवसांनी कायम सलाईन लावावं लागतंय. मी हे तुम्हाला सांगतोय कारण शेवटी हे शरीर कधी जाईल काही सांगता येत नाही. मी तुमच्यात किती दिवस राहीन हेही सांगता येत नाही. शरीर कधी धोका देईल हे सांगता येत नाही. मी केलेल्या कठोर उपोषणांमुळे आता मला चालताना, चढता, उतरतानाही चार चार पोरांना धरावं लागतंय, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे मराठा बांधव स्तब्ध झाले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील मतदानावेळीही जरांगे पाटील यांनी यावेळी महत्त्वाचं आवाहन केलं. ते म्हणाले की, मी लोकसभेला सांगितलं होतं आणि आताही सांगतोय की, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणा. ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा. मी तुम्हाला बंधनमुक्त केलं आहे. मी जात कुणाच्याही दावणीला बांधलेली नाही. मालक तुम्हाला ठेवलंय. मतदान तुम्हाला करायचं आहे. मालकपण तुम्हीच आहात. मी तुमचा मालक नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

दैनंदिन व्यवहारासाठी डिजिटल व्यवहाराचा मोठ्या प्रमाणात वापर-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ  यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.,पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सिंधूताईंना श्रद्धांजली वाहिली आहे,

‘हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यात “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ४५ लाख ४२ हजार ६७३ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ

vishwatmaklokswamivarta

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

vishwatmaklokswamivarta

राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण जाहीर, 8 हजार 500 कोटीस मान्यता,मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना…