
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक पेन आणि एक वही अभियानास प्रतिसाद…
राज्य प्रतिनिधी -:
डॉ. बाबासाहेंब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जालना शहरातील मस्तगड येथील डॉ. बााबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट (फॅम) च्या वतीने गुरुवार दि. 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून एक पेन आणि एक वही या अभियानास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान या अभियानास नागरीकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
विश्वरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्या (फॅम) च्या वतीने एक वही आणि एक पेन अभियान राबविण्यासाठी विनोद फकीरा वाघ यांनी सकाळपासून स्टॉल लावला होता. दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. हे अभियान महाराष्ट्रात स्थापन होऊन 10 वर्ष पूर्ण झाले असून मागील वर्षी जालना शाखेच्या वतीने नगर परिषद शाळा, टि. व्ही. सेंटर येथे वही आणि पेन वाटप करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी हार-फुले वाहून, मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहतात. ते दुसर्या दिवशी उपयोगाचे न राहता कचरा म्हणून वाया जाते. शिवाय भारताच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर शिक्षण हेच प्रभावी औषध आहे असे स्वत: बाबासाहेब सांगून गेले आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्याप्रमाणेच हे अभियान सुरु करण्यात आले आहे.
आज भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे आवश्यक आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगाराचे विद्यार्थी शैक्षणिक सुविधा अभावी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी किमान 20 ते 30 रुपयांचे हार-फूल घेतो, परंतु, तसे न करता बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्याच मूल्याचे एक वही व एक पेन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून फॅम कडे जमा करा असे आवाहन करण्यात आले होते. त्यास नागरीकांनी प्रतिसाद देत वह्या आणि पेनाचे दान करण्यात आले तर काहींनी आर्थीक रुपाने मदत करुन सहभाग नोंदविला. फॅम ते सर्व साहित्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवेल आणि त्यांच्या शिक्षणाला हातभार लावेल असे विनोद वाघ यांनी म्हटलंय. या अभियानास माजी आमदार मा. कैलास गोरंटयाल, माजी आमदार अरविंद चव्हाण, शेख महमूद, पोलीस निरीक्षक एस. जे. माने, पीएसआय नागरे, एन. आर. जावडे, प्राचार्य, डॉ. ए. डब्ल्यू. नेमाडे, प्रा. उन्मेष हिवराळे, फकीरा वाघ, सुमित बोर्डे, सचिन पगारे, किशोर जाधव, सुशील सूर्यवंशी, रिंकल तायड यांनी भेट देत सहभाग नोंदविला. सदरील अभियान यशस्वी करण्यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुंबाकले, भगवान तायड, विनोद भगत आदींनी परिश्रम
भारतीय बौध्द महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना



