vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीत आता डीआरपी आणि अदानीकडून पुन्हा जोमाने घरोघर सर्वेक्षणाचे काम सुरू….

धारावीत आता डीआरपी आणि अदानीकडून पुन्हा जोमाने घरोघर सर्वेक्षणाचे काम सुरू….

 

मुंबई प्रतिनिधी

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये अदानी कंपनी कडून झोपडपट्टी मोजण्याचे काम विधानसभा निवडणुका दरम्यान थांबले होते ते आता पुन्हा सुरू झालेले आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प यांचे अधिकारी आणि अदानी कंपनी यांच्याकडून घरोघरी जाऊन रहिवाशांची संख्या झोपड्यांची संख्या लाईट बिल इतर कागदपत्र यांची माहिती घेत सर्वे नंबर टाकण्याचे काम सुरू झालेले आहे

धारावी झोपडपट्टीमध्ये आजपासून अदानी कंपनीकडून झोपड्यांची संख्या, रहिवाशांची संख्या, आवश्यक इत्यादी माहिती गोळा करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहेधारावीमधील प्रत्येकाला घर मिळणार आहे. लोकांना 350 चौरस फुटांचे घर मिळणार आहे. एसआरए पेक्षा जास्त अधिक चौरस फुटाचे घर मिळणार, असल्याची माहिती अधिकारी देत आहे

राज्यात विधानसभा निवडणुका आणि काहींनी राजकीय लोकांनी केलेला विरोध या दरम्यान विधानसभा यांचे प्रचार कार्य जोरात होते दरम्यान अदानी आणि डी आर पी यांच्याकडून सर्वेक्षणाचे काम काही काळ थांबले होते यामुळे धारावीतील अनेक रहिवासी चिंतित झाले होते अनेकांना नंबर पडले होते तर अनेकांना नंबर पडणे बाकी होते या या पेचात पडलेल्या धारावीकरांना पुन्हा दिलासा देण्याचे काम अडाणी आणि डी आर पी च्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे ते म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन सर्वेक्षणाचा प्रत्येक घराला नंबर टाकून त्यांच्या कामाची पोचपावती त्यांनी दाखवली आहे सर्वेक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण नंबर टाकण्याची प्रक्रिया संपल्यावर कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे संपूर्ण धारावीकरांचे एकच स्वप्न आहे ते म्हणजे प्रत्येकाला हक्काचे घर सुसज्ज असा स्वच्छ वातावरण याकरता अदानी आणि डी आर पी धारावीकरांच्या झोपडपट्टी वासियांना सुंदर अशा इमारतीच्या घराचे निर्माण करून देणार आहेत

धारावी पुनर्विकास प्रकल्पातून रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी अद्यावत पायाभूत सुविधा, दळणवळणासाठी आंतरराष्ट्रीय सुविधा, तरुणांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम, पर्यावरण पूरक व्यवसायाभिमुख प्रशिक्षण,अद्यावत रुग्णालय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, खेळाची मैदाने अशा विविध सुविधा या पुनर्विकास प्रकल्पात दिल्या जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य सरकारची धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट (डीआरपी) आणि अदानी समूहाची धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) या दोन कंपन्यांच्या भागीदारीतून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे

यावेळी डी आर पी आणि अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की प्रत्येकाच्या घरावर नंबर टाकण्यात येणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही गोंधळ न करता सर्व सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यात यावे असे आव्हान अदानी कंपनी आणि डी आर पी कडून करण्यात आले असल्याचे माहिती आहे

संबंधित पोस्ट

मुंबईत 14 जानेवारीपासून सुरु होणार आयकॉनिक डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस; जाणून घ्या कुठे बुक कराल तिकिटे

vishwatmaklokswamivarta

विधानसभेकरीता मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे प्रवक्ते संदीप देशपांडेंसह ८ जणांविरुद्ध FIR दाखल; कोल्हापुरातील राडा राजकारण्यांना भोवणार?

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा-17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणप्रत्येक जिल्ह्यात होणार एक ‘मधाचे गाव’-रविंद्र साठे