vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सन २०२५ मध्ये-होणाऱ्या स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सन २०२५ मध्ये-होणाऱ्या स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी) सन २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र.ओतारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा, व मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट -ब सेवा मुख्य परीक्षा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी, अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैधमापक शास्त्र मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षांचा समावेश आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव ओतारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

सैनिकी मुलांचे वसतीगृह व कारगिल स्मृतीवन येथे कंत्राटी पद्धतीने पद भरती

vishwatmaklokswamivarta

आरसीएफ थळतर्फे मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

भल्या पहाटे मुख्यमंत्र्यांकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी,मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना.नागरिकांनी स्वच्छतेच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बीसीसीआयने टीम इंडियाला दिला 125 कोटींचा धनादेश, संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोषाचे वातावरण

घाटजाई देवी पालखी मिरवणूकीसाठी – वाहतूक मार्गात बदल

vishwatmaklokswamivarta