vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दीक्षाभूमीवर आल्याने प्रेरणा व नवी ऊर्जा मिळते – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

दीक्षाभूमीवर आल्याने प्रेरणा व नवी ऊर्जा मिळते – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन…

 

राज्य प्रतिनिधी-

नागपूर,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करुन प्रेरणा व नवी ऊर्जा मिळते. दीक्षाभूमीला आल्यानंतर नेहमीच वेगळी अनुभूती व समाधानही मिळते, अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर श्री.शिंदे यांनी बुद्ध प्रतिमा व बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेवून अभिवादन केले. मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, प्रताप सरनाईक, योगेश कदम, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दीक्षाभूमी ही तप आणि आदर्शाची भूमी आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होवून देश-विदेशातील अनुयायी येथे येतात व प्रेरणा घेतात. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच देशाचा व राज्याचा कारभार चालत आहे. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांना न्याय देणारे व जनसेवेला बळ देणारे आहेत. राज्यशासनाच्या वतीने तालुकानिहाय संविधानभवन बांधण्यात येत आहेत. तसेच चैत्यभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी ‘मविआ’ची मोर्चेबांधणी, निवडणुकीबाबत घटक पक्षांशी प्राथमिक चर्चेची शक्यता…

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशासह विविध परवानगीचे वितरण

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी (दि.२)

vishwatmaklokswamivarta

SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर!न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; पुरोगाम्यांचा दबाव दूर करण्यासाठी पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा !

vishwatmaklokswamivarta

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक