vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हिंदू जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी-हिंदु जनजागृती समितीची मागणी-महाकुंभच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा – सनातनी हिंदूंच्या श्रद्धेला जाणीवपूर्वक आघात करण्याचा प्रयत्न !

हिंदू जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी-हिंदु जनजागृती समितीची मागणी-महाकुंभच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा – सनातनी हिंदूंच्या श्रद्धेला जाणीवपूर्वक आघात करण्याचा प्रयत्न !

 

राज्य प्रतिनिधी-प्रयागराज- अरबमध्ये ‘वक्फ’ची संकल्पना जन्माला आली नव्हती, त्या लाखो वर्षांपूर्वीपासून गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्याचे आयोजन होत आले आहे. जिथे कुंभ भरतो, ती गंगा मातेची भूमी आहे. ती नैसर्गिक भूमी वक्फची कशी काय होऊ शकते? मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी कुंभमेळा स्थळावरील 54 बीघा भूमीवर वक्फचा दावा केला आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र विरोध करते. हा दावा केवळ निराधार नसून कुंभमेळ्याच्या पवित्र वातावरणाला गालबोट लावण्याचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा सुनियोजित प्रयत्न आहे, असे प्रतिपादन *हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे* यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि समितीचे कुंभ अभियान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते.

*सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले की*, कुंभमेळ्याच्या पवित्रतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही राज्य सरकारला आवाहन करतो की त्यांनी कठोर पावले उचलावीत आणि सनातनी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवणाऱ्या मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी.

वक्फ सुधार अधिनियमासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीसमोर हिंदूंची भूमिका मांडणारे *सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले की*, मौलाना शहाबुद्दीन रजवी यांच्या मते वक्फच्या भूमीवर कुंभमेळा आयोजित करणे हा मुस्लिम समाजाचा मोठेपणा आहे, असे असेल तर आम्हाला त्यांना विचारायचे आहे की, रामजन्मभूमीवर बाबरने केलेल्या अतिक्रमणाच्या वेळी मुस्लिम समाजाने ही उदारता का दाखवली नाही? आजही काशी, मथुरा, संभळ आणि अशा 15,000 मंदिरांवर इस्लामिक अतिक्रमण आहे. त्याबाबतीत त्यांनी उदारता का दाखवली नाही? कुंभ क्षेत्राला वक्फची भूमी मानणाऱ्यांना कुंभ क्षेत्रात प्रवेश नाकारण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.*श्री. विश्वनाथ कुलकर्णी,*समन्वयक, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य, हिंदु जनजागृती समिती

0000

संबंधित पोस्ट

व्हिंटेज ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे अग्निशमन सेवेतील पुनरागमन गौरवास्पद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे अनावरण

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘सेवाखंड क्षमापित’ करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळेआरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होणार-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर,150 वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड क्षमापित’ पत्रांचे वितरण…

vishwatmaklokswamivarta

महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान- ‘नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमातील भावनिक क्षण

सांगलीच्या सौंदर्यात भर पडेल अशी दर्जेदार कामे करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटीलमहानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा

रविवारी 1 फेब्रुवारी 2026  रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक .

vishwatmaklokswamivarta

♦️२००६ बॉम्बस्फोट प्रकरण : राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आव्हान.

vishwatmaklokswamivarta