vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कोकण भवनात भारतीय प्रजासत्ताक दिन पूर्व तयारीची बैठक संपन्न

कोकण भवनात भारतीय प्रजासत्ताक दिन पूर्व तयारीची बैठक संपन्न

 

नवी मुंबई, प्रतिनिधी: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आज पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या सामान्य शाखेचे अपर आयुक्त संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

कोकण भवनातील पहिला मजला, समिती सभागृह येथे झालेल्या या बैठकीत सिडको अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी विजय राणे, उद्यान अधीक्षक विशाल भोर, पनवेल महानगर पालिकेचे दशरथ भंडारी,नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सुलभा बारघरे,रायगड विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता एस.डी कट्टी,बृहन्‌मंबई राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्याक्षा श्रीम. अस्मिता जोशी, कोकण भवन विद्युत विभागाचे उप अभियंता प्रविणकुमार शिवदास, कोकण विभागातील विविध विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

कोकण विभागीय स्तरावरील भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 वा वर्धापन दिन समारंभ दि. 26 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 09.15 वाजता साजरा होणार आहे.मुख्य शासकीय ध्वजारोहण कळंबोली पोलीस मुख्यालय मैदानावर होणार आहे. त्या अनुषंगाने बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. पलांडे यांनी कोकण भवनातील सर्व विभागाने हा सोहळा यशस्वीरित्या व उत्साहात साजरा करण्याबाबत सूचना दिल्या. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी आणि हा कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे सांगून सर्वांनी शासकीय पोशाखात कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

बीड जिल्ह्यातील भूसंपादन मावेजा वाटपाच्या गैरव्यवहारातील  ७३ कोटींची रक्कम वसूल करणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान भ्रष्टाचारविरोधी संदेश प्रसारित करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

एम्समधील नॅट केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट

बदलापूर येथे दि.18 फेब्रुवारी रोजी’नक्शा’ प्रकल्पाचा होणार शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta