vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बदलापूर येथे दि.18 फेब्रुवारी रोजी’नक्शा’ प्रकल्पाचा होणार शुभारंभ..

बदलापूर येथे दि.18 फेब्रुवारी रोजी’नक्शा’ प्रकल्पाचा होणार शुभारंभ..

ठाणे,द प्रतिनिधी):- कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील मिळकतींचे अचूक भूमापन करून नकाशे व मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ‘नक्शा’ प्रकल्प सुरू केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आणि ड्रोन फ्लाईंग येत्या मंगळवार, दि.18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता कुळगाव-बदलापूर नगरपरिषद सभागृह, दुसरा मजला, श्रीजी बिल्डींग, घोरपडे चौक, कात्रप, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य किसन कथोरे, डॉ.बालाजी किणीकर, सुलभा गायकवाड कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, उपसंचालक अनिल माने, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी, या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अंबरनाथ तहसिलदार अमित पुरी, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख अंबरनाथ सुवर्णा पाटील यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अरुणोदय वॉकर्स 29 वी चालण्याची स्पर्धा एमआयजीत संपन्न

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्थांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन