vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अरुणोदय वॉकर्स 29 वी चालण्याची स्पर्धा एमआयजीत संपन्न

अरुणोदय वॉकर्स 29 वी चालण्याची स्पर्धा एमआयजीत संपन्न

[ मुंबई प्रतिनिधी-

बांद्रा येथे रोज सकाळी व्यायाम योगा हास्यविनोद यासह वार्षिक सहली क्रीडा स्पर्धा यासारख्या उपक्रमातून काम करणारी अरुणोदय वॉकर्स असोसिएशन बांद्रा पूर्व यांच्या वतीने रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी सहा ते नऊ या वेळात 40 ते 80 वयोगटातील स्त्री-पुरुषांकरिता चालण्याची वार्षिक स्पर्धा बांद्रा पूर्व एमआयजी ग्राउंड वर आज रोजी संपन्न झाली.

या स्पर्धेमध्ये ४० ते ८० वयोगटातील प्रत्येकी पहिल्या दुसरा तिसरा असे एकूण २५ रोख पारितोषिके अधिक १५ उत्तेजनार्थ पारितोषिके प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमासाठी एम आय जी क्लब ट्रस्ट चे चेअरमन श्री.मोहन नागपूरकर प्रमुख पाहुणे,रोटरी क्लब प्रेसिडेंट सौ.शानोबार मुरली. अरुणोदय चे मानद् अध्यक्ष डॉक्टर विजय देशमुख एन के जी बी बॅंक बांद्रा पुर्व घ्या शाखाप्रमुख सौ. जान्हवी पै, मानद् उपाध्यक्षा सौ.अंजली रिस्बुड,मानद् सचिव श्री.किरण भोगले इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.: सदर कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत श्री. किरण भोगले यांनी केले आभार सौ. शिल्पा शिरोळे यांनी मानले यावेळी सौ वसुंधरा देशपांडे, सौ. सुनंदा भोगले, सौ. शैलजा सोमाणी, श्री राजेश सोमाणी, श्री हेमंत देशपांडे, श्री संजय शिरोळे,श्री मोहन साळवी, एडवोकेट सी.डी शेषाद्री, सौ. विमला शेषाद्री आणि सहसचिव श्री दिलीप गाडेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.या स्पर्धेमध्ये 99 वर्षाचे जेष्ठ नागरिक व संस्थेचे हितचिंतक आणि सभासद श्री निळकंठ दादा श्रीखंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अभ्यागतांना मोफत टी-शर्ट, श्री संदीप पोरे यांचे तर्फे वाटण्यात आले तर एम आय जी क्लब व नेब्युला केटरर्स यांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला तर लीलावती हॉस्पिटल तर्फे कार्डियाक अम्ब्युलन्स व डॉक्टर आणि नर्सेस व इतर स्टाफ देण्यासाठी श्री उल्हास पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले डॉ.सिद्धार्थ वर्मा यांचे अमुल्य आमार्गदर्शन लाभले. जेनबर्ग्क्ट फार्मा यांनी पेन रिलिफ स्प्रे आणि त्यांची इतर उत्पादने दिली.सहसचिव दिलीप गाडेकर यांनी दिलेली माहिती

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू MTHL या मार्गावरील मार्ग क्र.116 व 117 या मार्गांवर ‘महिला विशेष’ बससेवा सुरु

माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

26 सप्टेंबरला हयात प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात शिबिराचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

समाजकल्याण कार्यालयात तृतीयपंथीय स्मृतीदिन उत्साहात साजरा; समान हक्क व सन्मानावर भर

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हवाई प्रवास शुल्क विषयक घेतला आढावा

🌧️ पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! 🚨छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पावसाळी नियंत्रण कक्षाचा मा. आयुक्तांनी आढावा घेत आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.