vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

14 जानेवारी रोजी कोकण विभागीय-पेन्शन अदालत

14 जानेवारी रोजी कोकण विभागीय-पेन्शन अदालत

 

               नवी मुंबई प्रतिनिधी :- कोंकण विभागातील पेन्शन अदालत दरमहा दुसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येते. या महिन्यातील विभागीय पेन्शन अदालत मंगळवार दि. 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वा. कोकण भवनातील कक्ष क्र. 106 सामान्य प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय कोंकण भवन येथे आयोजित केली आहे.
  या पेन्शन अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणांच्या अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणांबाबतच्या तक्रारी असल्यास सदर दिवशी त्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील. कोकण विभागातील पेन्शन धारकांनी या पेन्शन अदालतीला उपस्थित राहून पेन्शन विषयी आपले प्रश्न उपस्थित करावे. असे कोकण विभाग तहसिलदार,(सामान्य प्रशासन) महेंद्र बेलदार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले

00000000

संबंधित पोस्ट

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त-ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल)आस्थापनांना नियमावली जारी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक

दि.5ऑगस्ट रोजी पनवेल येथे जनता दरबाराचे आयोजन ….       

बारावी परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना शासनाचा दिलासा

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah

जालना शहरातील भटक्या जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta