vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

बालगृहातील प्रवेशितांचा जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे-9 ते 11 जानेवारी कालावधीत आयोजन..

बालगृहातील प्रवेशितांचा जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे-9 ते 11 जानेवारी कालावधीत आयोजन..

           सातारा प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये बालगृहे कार्यरत असून या बालगृहात अनाथ, निराधार, उन्मार्गी, विधी संघर्षग्ररूस्त मुले/मुली दाखल आहेत. दाखल प्रवेशितांचे अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळण्याचे दृष्टीने सातारा जिल्हयातील बालगृहात दाखल असलेल्या व इतर विदयालयातील प्रवेशितांच्या जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवाअंतर्गतच्या क्रीडा स्पर्धांचे 9 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली आहे.

जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या शुभहस्ते 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्‌डी, क्रिकेट, 100 मिटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा, संगित खुर्ची, उंच उडी, लांब उडी, इत्यादी क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. बौध्दिक स्पर्धांमध्ये बुध्दीबळ, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, समूह गीते या स्पर्धा होणार आहेत. चाचा नेहरू बाल महोत्सवामध्ये विजेता ठरलेल्या विजयी व उपविजयी संघाना शिल्ड, ट्रॉफी, स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी बालकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.या बालमहोत्सवाचा समारोप 11 जानेवारी रोजी होणार असून या कार्यक्रमासही जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख हे मान्यवर उपस्थित राहून मुलां-मुलींना मार्गदर्शन करणार आहेत.  00

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

महाज्योतीच्या माध्यमातून ७३ हजार मुलींना प्रशिक्षण – मंत्री अतुल सावे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण..

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव जिल्ह्यात वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गती

vishwatmaklokswamivarta

एक दिवसीय सायबर जागरुकता कार्यशाळा;आज जालना येथील कार्यालयांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

नियोजन समितीचा १०० टक्के निधी वेळेत खर्च करा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश २५ तारखेपर्यंत शहरात हॉकर्स झोन करा; फूटपाथ अडवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार पोर्टलसंबंधी प्रशिक्षणाचे आज आयोजन