vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी-दि.26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी-दि.26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 

ठाणे, प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालवधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिंकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

दि.29 डिसेंबर 2023 व दि.25 जानेवारी 2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, 2023 विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/व्यक्ती यांच्याद्वारा दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

    अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत व दि.26 जानेवारी 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावेत.00000

संबंधित पोस्ट

पंतप्रधानांनी देशभरातील 47 ठिकाणी 16व्या रोजगार मेळ्याचे उद्घाटन केले; 51000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे केले वितरण महाराष्ट्रातील मध्य रेल्वेद्वारे मुंबई, पुणे आणि नागपूर येथे रोजगार मेळ्याचे आयोजन; 450 हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईत निधन, संगीत क्षेत्रातील चिरतरुण सूर हरपला, सर्वत्र शोकभावना.♦️आशा भोसले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानमंडळाच्या डिजिटल डॅशबोर्डचे उद्घाटन• विधान परिषद सभापती, प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष, ॲड. राहुल नार्वेकर उपस्थित• प्रलंबित संसदीय आयुधांच्या रिअल-टाईम पाठपुराव्याला गती• विधानमंडळाच्या डिजिटल परिवर्तनात महत्त्वाचा टप्पा

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*• व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार*

देशभक्तीच्या प्रकाशात चमकला के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा 66वा वर्धापनदिन..! जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा अखंड 30 वर्षांचा प्रेरणास्त्रोत’शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग संपन्न..!

vishwatmaklokswamivarta

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश