vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संक्रांतपर्वात बचतगटाच्या महिलांचे दानाचे वाण-सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान

संक्रांतपर्वात बचतगटाच्या महिलांचे दानाचे वाण-सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महिला बचत गटातील महिलांनी आपले दातृत्व दाखवित सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान दिले आहे. सैनिक कल्याणासाठी योगदान देऊन महिलांनी संक्रांत पर्वात दानाचे वाण लुटले आहे. सैनिक कल्याण निधीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे या महिलांनी आज धनादेश सुपूर्द केला.

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत कार्यरत लोक संचलित साधन केंद्राअंतर्गत काम करणाऱ्या महिला बचत गटाच्या सदस्य महिलांनी १० हजार रुपयांचे आपले योगदान सैनिक कल्याण निधीस दिले. प्रगती लोकसंचलित साधन केंद्र लासूर स्टेशन, सावित्रीबाई लोकसंचलित साधन केंद्र, वाळूज, तेजस्विनी लोकसंचलित साधन केंद्र, गंगापूर, एकता लोकसंचलित साधन केंद्र, पैठण च्या संलग्न बचत गटातील महिलांनी प्रत्येक केंद्रामार्फत अडीच हजार रुपये असे एकूण १० हजार रुपये धनादेशाद्वारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या महिलांच्या दातृत्वाचे कौतुक केले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हासमन्वयक चंदनसिंग राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्रीमती सुवर्णा जाधव, महिला बालविकास अधिकारी श्रीमती रेश्मा चिमंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.०००००

संबंधित पोस्ट

जुन्या बँक खात्यात विसरलेले, अडकलेले पैसे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने व्याजासह परत मिळण्याची सुवर्णसंधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेंद्र राख यांची निवड*

आज शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयएएस आकाश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

vishwatmaklokswamivarta

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

vishwatmaklokswamivarta