vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेंद्र राख यांची निवड*

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राजेंद्र राख यांची निवड*

———————————————-

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत जालना येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस पक्षाच्या राजकारणात योगदान देताना कोणत्याही पदाची अपेक्षा न करणारे राजेंद्र राख यांना प्रदेश काँग्रेसने अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे राजेंद्र राख माजी मंत्री शंकरराव राख यांचे वैचारिक वारसदार आहेत , अगदी विद्यार्थी दशेपासून एन. एस. यु .आय. त्यानंतर युवक काँग्रेसच्या सर्व स्तरावरच्या वेगवेगळ्या चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे कार्यकर्ते म्हणून पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे नेते मानले जातात राजेंद्र राख यांनी काँग्रेस पक्षासाठी प्रदीर्घ असे 30 ते 35 वर्ष एकनिष्ठेने काम केलेले आहे, कोणत्याही पदाची अपेक्षा न करता पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला कार्यकर्ता ते नेता अशी त्यांची प्रतिमा आहे

स्वर्गिय लोकनेते विलासरावजी देशमुख , मा. खा. मुकुलजी वासनिक , मा. आ. नानाभाऊ पटोले , मा . आ. बाळासाहेब थोरात , मा. आ. विजय वड्डेट्टिवार व स्वर्गीय राजीव सातव यांच्या सोबतीने राजकारणातल्या सर्व संघर्षात व सत्तेच्या काळात आपल्या पक्षाच्या लोकांना न्याय भेटावा याच्यासाठी स्पष्ट भूमिका घेणारा एक सरळ मार्गी नेता अशी त्यांची ओळख आहे,   गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वर्गीय राजीव सातव जिवंत असताना जी संघर्षाची ठिणगी पडली होती त्यामध्ये राजेंद्र राख यांनी स्वतःच्या अंगावर वार झेलले आहेत .

 राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसीच्या राजकारणातला एक महत्त्वपूर्ण चेहरा राजेंद्र राख यांच्या रूपाने सर्वांना परिचित आहे.विधानसभा लोकसभा व स्थानिक निवडणुकीमध्ये सातत्याने त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा असताना पक्षाने मात्र त्यांना योग्य न्याय दिला नाही अशी स्थिती अनेक वेळा निर्माण झालेली आहे गेल्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जालना लोकसभेमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती . मात्र अचानक पणे कल्याण काळे यांना संधी भेटली विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला . आपल्याला उमेदवारी भेटली नाही म्हणून राजेंद्र राख यांनी कधीही पक्ष विरोधी काम केलेला इतिहास नाही उलट पक्षाने कठीण काळात दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याची हातोटी राजेंद्र राख यांच्या रूपाने नवीन कार्यकर्त्यांनी जवळून पाहिलेली आहे , राजेंद्र राख यांनी लोकसभेच्या निवडणुकीत व त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेले आहे , काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्रीमती प्रभा राव असल्यापासून त्यांना काँग्रेस पक्षाने प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी वेगवेगळ्या पदावर दिलेली होती माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले व आत्ता विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर सातत्यपूर्ण काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रतिमा आहे ,

राजेंद्र राख यांनी मधल्या काळामध्ये ओबीसीच्या राष्ट्रीय स्तरावरच्या काँग्रेस पक्षाच्या संघटनेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे, बीड जिल्ह्यातल्या व परभणी जिल्ह्यातल्या सामाजिक आंदोलनामध्ये त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे , त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा जी काढली होती त्या यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात चालणारा यात्री म्हणून राजेंद्र राख यांची ओळख आहे , जालना जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाल अत्यंत यशस्वी राहिलेला आहे , त्यांनी देशपातळीवर विविध राज्यात जाऊन पक्षाचे काम केलेले आहेत त्यानंतर राज्यस्तरावर त्यांना प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व मा. आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळेस प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे त्यांनी केलेल्या पक्षाच्या कामाचे फलित म्हणून त्यांच्यावर पक्षांनी अत्यंत विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे आगामी काळात जालना जिल्ह्यात पक्षाच्या वाढीसाठी राजेंद्र राख अधिक जोमाने काम करतील व आपल्याला दिलेल्या पदाला योग्य न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व मित्रपरिवारांनी अभिनंदन केले आहे .

संबंधित पोस्ट

निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – नवी मुंबई अंतर्गत शाळाप्रमुखांना अंतिम इशारा

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणव जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्रीमंगलप्रभात लोढा यांचा जिल्हा दौरा..

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा;27 व 28 जानेवारीला घेणार विविध विभागांचा आढावा

vishwatmaklokswamivarta