vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विभागीय सहायक भाषा संचालक योगेश शेट्ये यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ कोकण भवनात संपन्न

विभागीय सहायक भाषा संचालक योगेश शेट्ये यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ कोकण भवनात संपन्न

नवी मुंबई, प्रतिनिधी: भाषा संचालनालयाचे विभागीय सहायक भाषा संचालक योगेश शेट्ये हे नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या चार दशकांच्या शासकीय सेवेतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी भाषा संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई येथे एका छोटेखानी कार्यक्रमात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.   या प्रसंगी भाषा संचालक महाराष्ट्र शासन श्रीमती विजया डोणिकर, एसएनडीटी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम जाधव, सेवानिवृत्त प्रा. डॉ. किशोर देसाई, प्रा. राजंद्र शिंदे, कवि शिवाजी गावडे, कवि कमलाकर राऊत, सेवानिवृत्त हिंदी भाषा अधिकारी विलास उंबरकर, विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक संजिवनी जाधव-पाटील, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, तसेच भाषा संचालनालय आणि कोकण विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि मित्र परिवार उपस्थित होते.

योगेश शेट्ये यांनी दि. 2 ऑगस्ट 1993 रोजी भाषा संचालनालयाच्या अनुवादक (मराठी) या पदावरुन शासकीय सेवेत प्रारंभ केला. प्रामाणिक, मनापासूनची सेवा आणि कौशल्य या श्री. शेट्ये यांच्या कार्यशैलीची शासनाने दखल घेतली. त्यांना पुढे दि. 11 मार्च 2019 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय सहायक भाषा संचालक या पदावर पदोन्नती मिळाली. त्यानंतर ते बदलीने कोकण भवन येथे सध्याच्या विभागीय सहायक भाषा संचालक पदावर दि. 21 ऑगस्ट 2021 रोजी रुजू झाले. या विविध पदांवर काम करीत असताना त्यांनी प्रशासनामध्ये उत्तम आदर्श निर्माण केला. श्री. शेट्ये यांना केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे सन 2000 ते 2002 सालासाठी मराठी कादंबरीवरुन आलेले मराठी चित्रपट या विषयावर अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली होती.

कौतुकास्पद बाब म्हणजे श्री. शेट्ये यांना त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून भेट स्वरुपात मिळालेल्या रक्कमेत श्री. शेट्ये यांनी आपल्या जवळील काही रक्कम अधिक करुन अवनी गतीमंद निवासी विद्यालय, मुरबाड, जि. ठाणे या संस्थेतील गतीमंद मुलांच्या मदतीसाठी सर्व रक्कम भेट दिली आहे.

    या कार्यक्रमात त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे, मृदू वर्तनाचे आणि नेहमी मार्गदर्शक म्हणून दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. उपस्थितांनी श्री. शेट्ये हे ‘उत्तम लेखक’ ‘उत्तम वाचक’ ‘ तात्काळ निर्णय क्षमता’ असणारे शासकीय अधिकारी अशी विविध विशेषणे देत मनोगते व्यक्त केली. यावेळी श्री. शेट्ये यांच्या आई श्रीमती रुपश्री शेट्ये, पत्नी सौ. सुचिता शेट्ये, मुलगे निरज आणि पार्थ शेटये आणि मित्र परिवार उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या शेवटी योगेश शेट्ये यांनी आपल्या भावनिक मनोगतात सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत अनुभव सांगितले की, भाषा संचालनालय विभागाने मला भरभरून दिले. या विभागात मला उत्तम मित्र भेटले तीच माझी खरी संपत्ती आहे.

00000000

संबंधित पोस्ट

बोगस कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई – अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

vishwatmaklokswamivarta

वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची मृतात्म्यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनता पक्ष धारावी विधानसभा प्रभाग 186 मध्ये  भाजप जिल्हा सचिव रमेश नाडार यांच्या मार्फत भाजपा सदस्य अभियान जनतेचाअभुतपूर्व नोंदणी समर्थन…

पुढील ३ तासात मुंबई मुंबई उपनगर पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह ताशी ५०-६० किमी वेग जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. – मंत्रालय

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाऊबीज निमित्त दहिसर रिवर फेस्टिवल ला सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न