vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची मृतात्म्यांना श्रद्धांजली

वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची मृतात्म्यांना श्रद्धांजली

 

राज्य प्रतिनिधी-

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ज्यू लोकांचे मुंबईतील प्रार्थनास्थळ असलेल्या केनेसेथ इलियाहू सिनेगॉग येथे दुसऱ्या महायुद्धात हत्या करण्यात आलेल्या लाखो ज्यू लोकांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहिली. जागतिक वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त या स्मृतीसभेचे आयोजन जेकब ससून ट्रस्टच्या वतीने सोमवारी (दि. २७) करण्यात आले होते.

दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांचा नरसंहार झाला, त्या इतकी दुर्दैवी आणि क्रूर घटना मानव जातीच्या इतिहासात कधीही झाली नाही. मात्र सुसंस्कृत समाजाने बदल्याच्या भावनेने पेटून न उठता गतकाळ मागे सारुन समोरच्या व्यक्तीचे हृदय परिवर्तन केले पाहिजे, असे यावेळी राज्यपालांनी सांगितले.

या स्मृतीसभेला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी, जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत एकिम फेबिग, अमेरिकन दूतावासातील वरिष्ठ अधिकारी मायकल श्रुडर, जेकब ससून ट्रस्टचे अध्यक्ष सॉलोमन सोफर, विविध देशांचे वाणिज्यदूत तसेच ज्यू धर्मीय उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

ठाण्यात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराआमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

अग्रवाल युवा मंचची नुतन कार्यकारिणी जाहीर…

vishwatmaklokswamivarta

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्याशिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार

vishwatmaklokswamivarta

कल्याण शहरातील अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· *नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण*

आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन