vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी(दि.२८)

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी(दि.२८)

 

    छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंगळवार दि.२८ रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती बसस्टँड रोड, मालजीपूरा येथे सकाळी साडेनऊ वा. मेळावा होणार असून जिल्ह्यतील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. त्यात मेटलमन ऑटो प्रा.लि., औरंगाबाद ॲटो ॲन्सिलरी प्रा.लि., कॉस्मो फिल्मस लि, संजीव ॲटो पार्टस मोटर प्रा.लि, फोर्ब्स प्रेसीशन टुल्स ॲड मशिन पार्टस लि, लिभेर अप्लायन्सेस प्रा.लि, अलंकार ग्रूप, ग्रीव्हज कॉटन प्रा.लि, पॅरासन मशिनरी इ.प्रा.लि, मराठवाडा ॲटो कॉम्पो प्रा.लि, मायलन लॅबोरेटरी लि इ. यात सहभागी होणार आहेत. इंजिनिअरिंग, डिप्लोमा, आयटीआय, एचएससी, एस एस सी उत्तीर्ण इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी विविध प्रकारची ३७८ पदे उपलब्ध असून पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना रोजगार नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड लॉग इन होऊन ऑनलाईन अर्ज करुन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अर्ज करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२४०- २९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र एस. आर. वराडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृह परिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध …

vishwatmaklokswamivarta

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

स्मारक, संदर्भग्रंथाने रा. सू. गवईंच्या कार्याचा गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कुटुंब’संस्था मजबूत करणे हाच मानस-रूपाली चाकणकर जनसुनावणीत १५२ तक्रारी निकाली

vishwatmaklokswamivarta

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –  पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…

 रील शूट करताना धडक, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू,