vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीएसओपीची प्रभावी अंमलबजाणी करावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीएसओपीची प्रभावी अंमलबजाणी करावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 मुंबई, प्रतिनिधी : जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजाणी करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्ययावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना सादर करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिल्या.

मंत्रालय येथे जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भावबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, आयुषचे संचालक डॉ.रमण घुंगराळेकर आदी प्रत्यक्ष तर सर्व शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे अध्यक्ष दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या विषाणूबाबत नागरिकांमध्ये उपाययोजनांसाठी जनजागृती करण्यात यावी. ज्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणांनी देखील आवश्यक औषध पुरवठा आणि साधनसामुग्री उपलब्ध करून घ्यावी, असेही यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. *जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे :** अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी किंवा लकवा* अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी* जास्त दिवसांचा डायरियाअशा प्रकारचे लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.

*जीबीएस विषाणुपासून बचावाच्या उपाययोजना :** पाण्याचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे.* ताजे आणि स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करावे. संसर्ग टाळण्यासाठी शिजवलेले आणि न शिजवलेले अन्नपदार्थ एकत्र ठेवू नये.* वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.00000000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला रस्ते विकास, पाणी पुरवठा योजनेचा आढावाअतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

चेंबूर येथे शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर चौघे विद्यार्थी जखमी,महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात दिली भेट जखमींची केली विचारपूस; मृत विद्यार्थ्याच्या पालकांप्रती संवेदना व्यक्त करून दिला धीर घटनेच्या चौकशीचे दिले निर्देश

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप  विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..

विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन

vishwatmaklokswamivarta

मुक्तबंदी, परिविक्षाधीन बंदीच्या सहायक अनुदानात दुप्पट वाढ; निर्दोष बंद्यांनाही पुनर्वसनासाठी आता मिळणार ५० हजार रूपयांचे अनुदान- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन**जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta