vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता-पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक* जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण ४००.७८ कोटी* अनुसूचित जाती उपयोजना १०० कोटी* आदिवासी घटक कार्यक्रम १८.६५ कोटी

 नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता-पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक* जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण ४००.७८ कोटी* अनुसूचित जाती उपयोजना १०० कोटी* आदिवासी घटक कार्यक्रम १८.६५ कोटी

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने  मंजूर आराखड्यातील सर्व कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे- ना. मकरंद पाटील चालु आर्थिक वर्षासाठी (2024-25) ४४० आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ३९४ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांसाठी राज्य शासनाकडून एकूण नियतव्ययपैकी १७६ कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी १५१ कोटी रुपये (८५.८३%) निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी उपलब्ध करुन मिळण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करणार असून तो लवकरच प्राप्त होईल. तथापि मंजूर आराखड्यातील सर्व कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले

या बैठकीत सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी घटक कार्यक्रमाच्या जानेवारी अखेर खर्चाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मुळ मंजूर नियतव्यय ४४० कोटी रुपये असून त्यापैकी ३९३.३१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जाती उपयोजना योजनेसाठी मुळ मंजूर नियतव्यय १०० कोटी रुपये असून त्यापैकी ८१.०१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या आहे. तसेच आदिवासी घटक कार्यक्रम योजनेसाठी मुळ मंजूर नियतव्यय १८.०९ कोटी रुपये असून त्यापैकी ६.०८ कोटींच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

तसेच या बैठकीत जिल्ह्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, रस्ते आदी क्षेत्रातील कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शासकीय रुग्णालयांची सुधारणा, जिल्हा परिषद शाळांतील प्रसाधनगृह स्वच्छता, वैद्यकीय अधिकारी भरती, ट्रॅामा केअर सेंटर, मॅाडेल स्कुल, मागेल त्याला सौर कृषी पंप, व्यायमशाळा, पीक विमाबाबत आमदारांनी उपस्थित केलेल्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व्यवहारे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.00000

संबंधित पोस्ट

मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची गुणवत्ता योग्यच किरकोळ कामे (फिनिशिंग टच) असल्यास ती पूर्ण करावीत आणि हिरवळ विकसित करावी..मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रत्यक्ष भेटीप्रसंगी निर्देश..

केंद्राकडे प्रलंबित असलेला रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तत्काळ मंजूर करावा- : रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

देवस्थान इनाम जमिनींसाठी लवकरच कायदा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्याच्या शेवटी मोठे ब्लॉक घेण्यात येणार: मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती ..