vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची गुणवत्ता योग्यच किरकोळ कामे (फिनिशिंग टच) असल्यास ती पूर्ण करावीत आणि हिरवळ विकसित करावी..मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रत्यक्ष भेटीप्रसंगी निर्देश..

मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची गुणवत्ता योग्यच किरकोळ कामे (फिनिशिंग टच) असल्यास ती पूर्ण करावीत आणि हिरवळ विकसित करावी..मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रत्यक्ष भेटीप्रसंगी निर्देश..

मुंबई प्रतिनिधी गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान विस्तारित टप्प्याची बांधकाम गुणवत्ता चांगली असल्याचे प्रत्यक्ष पाहणीवेळी आढळून येत आहे. तथापि, काही ठिकाणी आढळणारे लहान उंचवटे काढून टाकावेत, रस्त्याच्या कडा योग्य कराव्यात आणि इतर काही किरकोळ कामे (फिनिशिंग टचेस) असल्यास ती पूर्ण करावीत. तसेच, उड्डाणपुलाच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव येईल, अशा रीतीने व्हर्टिकल गार्डन किंवा अन्य योग्य पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत.

🔷महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक ९ जून २०२६) सायंकाळी गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले.

🔷स्थानिक नगरसेवक श्री. संदीप पटेल, नगरसेविका श्रीमती प्रीती सातम, प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. उमेश बोडके यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

🔷महापौर श्रीमती तावडे यांनी मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्यावर सर्व संबंधितांसह प्रत्यक्ष फिरून पाहणी केली. ठिकठिकाणी बांधकाम, भौमितिक रचना, वक्राकार वळण आणि त्या संदर्भात करावी लागणारी अभियांत्रिकी प्रक्रिया, बांधकाम सांधे याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी अभियंत्यांकडून जाणून घेतली.

🔷संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलावरील वाहन मार्गावर ४० मिलिमीटर जाडीचा मास्टिक अस्फाल्ट हा वेअरिंग कोर्स म्हणजे पृष्ठभाग प्रदान करण्यात आला आहे. वाहतूक सुरू करण्यापूर्वी ओबडधोबड आणि असमान वाटणारा हा पृष्ठभाग प्रत्यक्षात रस्त्याचा वापर जसा जसा होत जातो तसा तसा अधिक समतल होत जातो आणि दृश्य स्वरूपात हा ओबडधोबडपणा कमी होतो. नव्याने बांधलेल्या रस्त्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि जलरोधक गुणधर्म, दीर्घकालीन टिकाऊपणा तसेच गंजविरोधीक्षमता व दीर्घ सेवा आयुष्य यामुळे या तंत्रज्ञानाचा पुलांवर उपयोग केला जातो, अशी माहिती अभियंत्यांनी दिली.

🔷सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सांगितले की, अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पाहणीअंती या उड्डाणपुलाची गुणवत्ता चांगली असल्याचे जाणवते आहे. तथापि लहान लहान आढळलेले ओबडधोबड भाग / उंचवटे काढून टाकणे, रस्त्याच्या कडा योग्य करणे, अधिकचे दिशादर्शक फलक लावणे, रस्त्याच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव यावा यासाठी व्हर्टिकल गार्डन किंवा योग्य तो पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करणे, इत्यादी कामे पूर्ण करावीत. अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कालावधी लोटल्यानंतर संपूर्ण पुलावर समतल रस्त्याचा अनुभव येईल, असे महापौरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले.

संबंधित पोस्ट

जालन्यात मोकाट कुत्रे व नागरी समस्यावर शिवसेना आक्रमक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलनभवानीनगर येथे मोकाट कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके..

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूडचे हसमुख विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन..

vishwatmaklokswamivarta

बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षि शाहू सहकारी बँकेचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर शुल्कवाढ नियमांत दुरुस्ती करण्यात येणार- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा- जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न