vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत तसेच नवीन बसेसची मागणी केली आहे .*बेस्ट समिती अध्यक्षांना राजोल पाटील यांचे निवेदन; भांडुपच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष*

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत तसेच नवीन बसेसची मागणी केली आहे .*बेस्ट समिती अध्यक्षांना राजोल पाटील यांचे निवेदन; भांडुपच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष*

मुंबई प्रतिनिधी- भांडुप परिसरातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात नगरसेविका राजोल पाटील यांनी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांची कुलाबा येथील बेस्ट भवन येथे भेट घेत महत्त्वपूर्ण निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत तसेच नवीन बसेसची मागणी केली आहे .

या भेटीदरम्यान राजोल पाटील यांनी भांडुप परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी केली. विशेषतः वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अपुरी सुरक्षितता व नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

राजोल पाटील यांनी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना दिलेल्या पत्रात दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी भांडुप स्टेशन रोड परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघाताचा आवर्जून उल्लेख केला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून देत, संबंधित विभागामार्फत ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी राजोल पाटील यांनी भांडुपसह मुंबई उपनगरातील प्रवाशांच्या दैनंदिन गैरसोयीचाही मुद्दा उपस्थित केला. प्रवाशांची वाढती संख्या व अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवाशांच्या सोयीसाठी भांडुप, विक्रोळी, मुलुंड, घाटकोपर तसेच मुंबईतील विविध भागांसाठी बेस्ट बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली.

राजोल पाटील यांनी सांगितले की, भांडुपकरांच्या सुरक्षिततेचा व सोयी-सुविधांचा प्रश्न हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना व मृतांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी राजोल पाटील यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. राजोल पाटील यांच्या या

0000

संबंधित पोस्ट

महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करा चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी आरक्षण जाहीर*

vishwatmaklokswamivarta

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ*राज्याच्या विकासात बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन आणि विद्यार्थ्यांचा आवाज अभियानाला शहर काँग्रेसची धार महाराष्ट्र राज्य सहप्रभारी रेहाना रियाज चिश्ती यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; युवक-विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पूर्वतयारी प्रशिक्षणऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

वर्धा जिल्ह्यातील ‘बोर’, ‘धाम’ सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख..