vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जळव ते बामणेवाडी रस्ता कामाचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन*

*जळव ते बामणेवाडी रस्ता कामाचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन*

 

 सातारा प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या योजनेमधून मंजूर टीआर १७ ते सीपीआर ७ जळव ते बामणेवाडी या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले.जळव ते बामणेवाडी या काँक्रिटीकरण रस्ता कामाचे भूमिपूजन जळवफाटा येथे

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच रामचंद्र पवार , विश्वास पवार , विजयराव सपकाळ, इंजिनियर कांबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, जळव ते बामणेवाडी या रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दहा कोटी 17 लाखाची असून तांत्रिक मंजुरी आठ कोटी पंधरा लाखाची मिळाली आहे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दहा वर्षात 47 लाख 64 हजार रुपये लागणार आहेत. या अनेक वर्षे मागणी होत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना चांगली सुविधा निर्माण होणार आहे. सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच कामाचा दर्जा चांगला राखावा अशी सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी यांनी दिली.

संबंधित पोस्ट

तळागाळातील लोकांना कायद्याच्या माहितीसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आवश्यक – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रजिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक जनजागृती मोहीम

भूसंपदा क्षेत्रीय गटाचे सर्वेक्ष न नागरिकांनी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त समारोह राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या बॅच प्रशिक्षणाचा राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य समारोप

राष्ट्रीय लोकअदालतीला उस्फुर्त प्रतिसाद 6 हजार 542 प्रकरणे निकाली…

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी८ महिला व १ पुरुष क्रिकेटपटूची राज्यस्तरीय संधी; प्रशिक्षक ऋषिकेश काने यांच्या मार्गदर्शनाला यश

विधान परिषद प्रश्नोत्तर :नर्मदा नदीचे ११ टीएमसी पाणी वापरासाठीचीप्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन