vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला;वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला;वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

मुंबई, प्रतिनिधी: मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव दि.५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू.) येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर “लेखक तुमच्या भेटीला” आणि “एका संगीतकाराची मुशाफिरी” या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दि. ६ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन, व्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत. तसेच “शब्दव्रती” या कार्यक्रमात निवडक मराठी कवयित्रींच्या कविता सादर केल्या जातील. याशिवाय, ग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधिक गौरव करून ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहेत. दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा मुंबईकर नागरिक, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई शहर शशिकांत काकड यांनी केले आहे.0000

संबंधित पोस्ट

जालना शहर महापालिका श्री गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आयुक्त यांचे हस्ते स्थापना.

नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके अनुकंपाधारक व सरळसेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*

महाराष्ट्रात येणाऱ्या स्थलांतरित मजुरांवर निर्बंध घालण्यासाठी सक्षम कायदा करावा.

vishwatmaklokswamivarta

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्काराने सन्मानित..