vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आरटीई” प्रवेशासाठी पालकांनीकोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई-शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी

आरटीई” प्रवेशासाठी पालकांनीकोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई-शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी

ठाणे, प्रतिनिधी:- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार आरटीई 25 टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे.आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे अवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.

अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी मनपा/नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmh2@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांच्याकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदवावी. तथापि, असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी कळविले आहे.00000

संबंधित पोस्ट

दादासाहेब फाळके यांच्या रुपाने मराठी माणुसच भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक ठरल्याचा आम्हाला अभिमान – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

vishwatmaklokswamivarta

आपत्तीग्रस्त व पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा पुढाकार# सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणारा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांसह भाविकभक्तांनी घेतला महाप्रसादाचे लाभ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी.

vishwatmaklokswamivarta

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta