vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बालकांची खरेदी विक्री करणे तसेच बेकायदेशीररित्या बाळाला दत्तक देणे कायद्याने गुन्हा

बालकांची खरेदी विक्री करणे तसेच बेकायदेशीररित्या बाळाला दत्तक देणे कायद्याने गुन्हा

 

 राज्य प्रतिनिधी- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ठाणे येथे दि.31 जानेवारी 2025 रोजी 181 या हेल्पलाईनद्वारे उल्हासनगर येथे राहणाऱ्या महिलेची कौटुंबिक वादाची माहिती प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त होताच उल्हासनगर येथील सखी केंद्र 1 यांच्याकडून त्वरित महिलेला संपर्क साधण्यात आला व तिला उल्हासनगर येथील महिला व बाल विकास विभागाच्या सखी केंद्राच्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले. पिडीत महिलेने दिलेल्या माहितीवरुन ती अविवाहिता असून लीव्ह इन रिलेशनशिप मध्ये एका पुरुषासोबत राहत होती. परंतू गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यामध्ये वाद होत असल्याने ती पीडित महिला तिच्या आईसोबत उल्हासनगर येथे राहत होती. पीडिता ही गरोदर असताना त्याने होणाऱ्या बाळाचे पालकत्व स्वीकारण्यास परवानगी दिली होती, परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर मात्र आपली आर्थिक परीस्थिती खराब असून आपण त्या बाळाला सांभाळू शकत नसल्याने ते बाळ एका गरजू कुटुंबाला देण्याचे दोन्ही जैविक पालकांनी ठरवले. त्यानुसार ते बाळ कळवा येथील एका महिलेला देण्यात आले व तसे पेपर तयार केले. पीडित महिलेने दिलेल्या तोंडी माहितीनुसार त्या बाळाबद्दल 10 हजार रुपये तिला दिले असून पेपरवर त्याचा काही उल्लेख न केल्याचे तिने सांगितले. सखी केंद्राला बाळाच्या खरेदी विक्री झाल्याबद्दल लक्षात येताच महिला बाल विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ठाणे यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ठाणे यांच्या आदेशानुसार संबंधित कक्षाच्या कर्मचाऱ्यानी कळवा पोलिस स्टेशन गाठले. कळवा पोलिसांच्या मदतीने 31 जानेवारी 2025 रोजी रात्री कळवा येथील झोपडपट्टीत या बाळाचा शोध घेवून त्या बालकाला रात्री 12.30 वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. बाळाची परीस्थिती ठीक नाही हे लक्षात येताच ठाणे बाल कल्याण समिती यांच्या आदेशान्वये बाळाला उपचाराकरीता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले. दवाखान्यातून बाळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाल कल्याण समिती समोर हजर करून त्यास जननी आशिष दत्तक संस्था, डोंबिवली येथे दाखल करण्यात आले आहे.

ठाणे बाल कल्याण समिती यांनी दिलेल्या आदेशानुसार दि.12.02.2025 रोजी बालकाचे जैविक पालक तसेच बेकायदेशीर दत्तक पालक यांच्यावर विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात संबधित प्रकरणाविरोधात बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये कलम 80, 81 नुसार गुन्हा क्र.0105/2025 नोंद करण्यात आलेला आहे.

बालकांची खरेदी विक्री करणे तसेच बेकायदेशीररित्या बाळाला दत्तक देणे हा कायद्याने गुन्हा आहे. जर पालकांना बाळ दत्तक घ्यायचे असेल तर त्यांनी cara.gov.wcd.in या संकेतस्थळावर जाऊन तेथे नोंद करणे आवश्यक आहे व ही प्रक्रिया कायदेशीर दत्तक प्रक्रिया आहे. तसेच मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक 1098 येथे अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी केले आहे.

ठाणे बाल कल्याण समिती यांनी दिलेल्या आदेशानुसार दि.12.02.2025 रोजी बालकाचे जैविक पालक तसेच बेकायदेशीर दत्तक पालक यांच्यावर विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात संबधित प्रकरणाविरोधात बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये कलम 80, 81 नुसार गुन्हा क्र.0105/2025 नोंद करण्यात आलेला आहे.00000

संबंधित पोस्ट

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हिच ईश्वर सेवा समजून काम करावे..! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

महाडच्या वरंध घाटातील अपघात ग्रस्त प्रवाश्यांची मंत्री गोगावले यांनी केली विचारपूस

शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत– आमदार संजय खोडके संपूर्णत: अभियानाचा सन्मान सोहळा

आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होणार;मतदारांनी बीएलओ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सीता मातेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र विकासासाठी केले भूमिपूजन,विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक याचा स्वीकार करणार नाहीत