vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

            सांगली, प्रतिनिधी: कौटुंबिक न्यायालय, सांगलीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालय, सांगली येथे नांदा सौख्यभरे आयोजित करण्यात आला. कौटुंबिक न्यायालय सांगलीचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.

यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा मनोमिलन होवून नांदवयास गेलेल्या जोडप्यांचा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सुनिता तिवारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी न्यायालयात पक्षकारांसोबत आलेल्या त्यांच्या बालकांना सोबत घेऊन दिप प्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात झाली.

 अध्यक्ष स्थानावरून बोलताना न्यायाधीश सुनिता तिवारी यांनी कौटुंबिक वादाचे वैकल्पिक निवारण आणि जोडीला मुलांच्या हक्कांचे संगोपण, संस्कार जोपासण्याचे प्रतिपादन केले. यावेळी फुगे व फुलांनी न्यायालयाची सजावट करण्यात आली होती. सन्मान करण्यात आलेल्या पक्षकारांच्या मुलांच्या सोबतीने केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्री सुहास धोतरे यांनी गीत सादर केले.

  प्रस्तावना व संकल्पना कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक ज्योती बावले – भालकर यांनी केली. यावेळी जेष्ठ विधीज्ञ किरण पाटील, शकील पखाली, जयंत नवले, गणेश भोई, तेजस सन्मुख, शितल सावंत, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र वायदंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन संजय लोणकर यांनी केले. आभार सहाय्यक अधिक्षक शैलजा वेदपाठक यांनी मानले.

 कार्यक्रमास न्यायालयाचे प्रबंधक एस.व्ही. दांडेकर, विकास राऊत, महेश खटावकर, श्रृती दुधगांवकर, सुनिता चौगुले, प्रतिभा महाडीक, शरद चांदवले, सुहास धोतरे, तृप्ती फासे व अंगरक्षक अश्विन सोनेकर, महिला पोलिस नगिना पाटील तसेच विधीज्ञ व पक्षकार उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

vishwatmaklokswamivarta

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत,सांगली जिल्हा राज्यात अव्वल- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

जलसंपदा विभाग-रायगडमधील शिलार प्रकल्पासाठी ४ हजार ८६९ कोटी…

उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या निभावून आव्हानांचा धैर्याने सामना करा- प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

नक्षलवादविरोधी लढाईत एक ऐतिहासिक यश-सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सीपीआय-माओवादी सरचिटणीस बसवराजू यांच्यासह २७ माओवाद्यांना कंठस्नान घातले 

vishwatmaklokswamivarta