vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाचे आज 2 मार्चला उद्घाटन

नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाचे आज 2 मार्चला उद्घाटन

 

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकृत संकुल उद्या, रविवार, दि. 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. हा उद्घाटन समारंभ रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहणार असून, त्यांच्या शुभहस्ते या संकुलाचे लोकार्पण होणार आहे. तसेच, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, मुंबई शहर एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, कौशल, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये संजय मोने, पुष्कर श्रोत्री, सुभाष नकाशे, नंदेश उमप, रोहन पाटील व अन्य कलाकारांचा समावेश आहे.00000

संबंधित पोस्ट

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे नियोजनआवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यांची खबरदारी घेण्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांचे निर्देश,कालवा सल्लागार समितीची सन 2024-25 (रब्बी व उन्हाळी हंगाम) बैठक

इराण-इराक मधील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन-जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव गावासाठी टँकर मंजूर

vishwatmaklokswamivarta

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण