vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना  उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना  उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

 

रायगड प्रतिनिधी:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व महाड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता दि.12 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत महाड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, प्लॉट न.पी-43, एमआयडीसी परिसर, महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना (Internship) उमेदवार निवड मेळावा आयोजित केला असून जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा फायदा लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अमिती पवार यांनी केले आहे.

 जिल्ह्यातील नामांकीत 10 आस्थापनांकडील रिक्तपदांच्या, इंटर्नशिप भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी, आय.टी.आय., डिप्लोमाइंजिनियर, पदवीइंजिनियर, व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. व तसेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनामध्ये इंटर्निीशिपला अप्लायकरण्यासाठी https://cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Intern Login ला क्लिक करुन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली प्रोफाईल व शैक्षणिक माहीती अद्ययावतकरुन Apply for Jobs ला क्लिक करुन आपला जिल्हा निवडून दिसणाऱ्या आस्थापनेच्या रिक्त पदांना Apply करावा.

रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा श्री.महेश भा.वखरे,लिपिक-टंकलेखक यांचे 9421613757 या दुरध्वनी क्रमांकावर वर संपर्क साधावा.

०००००००

संबंधित पोस्ट

अनुदानित खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक;२६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; विक्री व साठ्यात आढळली तफावत

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यातील ओल्या दुष्काळावर तात्काळ निर्णय घ्या – खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी

vishwatmaklokswamivarta

जव्हार अर्बन बँकेच्या नोकर भरतीसाठी सुधारित प्रस्ताव सादर करा – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

vishwatmaklokswamivarta

गोकुळ’चे ‘हलाल प्रमाणपत्र’ तत्काळ रद्द करा; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक*

vishwatmaklokswamivarta

आज 🌧️ रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील शाळांना 2 जुलै  सुट्टी जाहीर केली

पीएमआरडीए’ची संकटमोचक टीम; शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यात यश…!!