vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठवाड्यातील ओल्या दुष्काळावर तात्काळ निर्णय घ्या – खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी

मराठवाड्यातील ओल्या दुष्काळावर तात्काळ निर्णय घ्या – खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी

छत्रपती संभाजीनगर | जालना – मराठवाड्यात मागील दोन-तीन दिवसांपासून झालेल्या अति मुसळधार पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना थेट निवेदन देऊन जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तात्काळ “ओला दुष्काळ” जाहीर करावा अशी ठाम मागणी केली आहे.

डॉ. काळे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यात १२० मिमी ते २२० मिमी एवढा अति मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतजमिनींवर उभ्या असलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही ठिकाणी पिके व जमीन वाहून गेली आहे. शेतकऱ्यांची जनावरे, गोठे, शेतातील बांध व पाणीसाठ्याच्या संरचना वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

फक्त शेतकरीच नव्हे तर नागरी भागातही मोठी हानी झाली आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरून घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी शिरल्याने मोठा आर्थिक तोटा झाला असून नागरिकांच्या डोळ्यात हतबलतेचे अश्रू आहेत.

खासदार डॉ. काळे यांची प्रमुख मागणी:जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.महसूल, कृषी व पशुसंवर्धन विभाग यांची संयुक्त पथके स्थापन करून तातडीने पंचनामे करावेत.शेतकऱ्यांच्या कर्जाची तात्पुरती स्थगिती व व्याजमाफी देण्यात यावी.व्यापारी व नागरी भागातील नुकसानग्रस्तांना स्वतंत्र निधीतून तात्काळ दिलासा देण्यात यावा.सर्व प्रक्रिया पारदर्शक व जलदगतीने राबवून खऱ्या बाधितांपर्यंत मदत पोहोचावी.“ही फक्त नैसर्गिक आपत्ती नसून शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आयुष्यावर आलेला प्रचंड आघात आहे. या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री यांनी तत्काळ आदेश देऊन शेतकरी व नागरिकांच्या डोळ्यातील अश्रू पुसावेत, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी बळ द्यावे,” असे डॉ. काळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले.

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान‘मिशन महाग्राम’राबवून गावे समृद्ध करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

अकोले येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, आवश्यक पदांना मान्यता

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना- ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संवेदनशीलतेने विट्याच्या रेयांश पवारला मिळाले जीवनदान- जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात दात्यांचा मोलाचा हातभार- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतूनही मिळाले एक लाख पंच्याहत्तर हजार…

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर 

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)*मंत्रिमंडळ निर्णय …