vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

ई-चलानद्वारे दंडात्मक रकमेचा भरणा प्रलंबित असलेल्या वाहनमालकांनी-एआय रिकव्हरी असिस्टंस् द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणा करावा..

ई-चलानद्वारे दंडात्मक रकमेचा भरणा प्रलंबित असलेल्या वाहनमालकांनी-एआय रिकव्हरी असिस्टंस् द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणा करावा..

ठाणे, प्रतिनिधी:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे कार्यालयाद्वारे दि.08 मार्च 2025 पासून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मोटार वाहन थकीत कर असलेल्या वाहनांच्या मालकांना व वाहन तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ई-चलानद्वारे दंडात्मक रकमेचा भरणा प्रलंबित असलेल्या वाहन मालकांना एआय रिकव्हरी असिसटंस (AI Recovery Assistance) द्वारे त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर कॉल करून parivartan.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरणा करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

तसेच याद्वारे वाहनांची कागदपत्रे जसे की, इन्शुरन्स, फिटनेस, पी यु सी, यांची वैधता समाप्त झालेल्या वाहन मालकांना देखील वाहनांची कागदपत्रे वैध करण्याबाबत अवगत केले जात आहे. वाहन मालकांनी कर व दंड भरण्यासाठी आवश्यकता भासल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय..-सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट; जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका

व्याख्यानः’सायबर गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’विद्यार्थ्यांनो प्रलोभनांपासून सावध रहा- रुपाली चाकणकर ००खरे हिरो ‘राष्ट्रपुरुष’ … रिलस्टार्स नव्हे-अमोल सातोडकर

vishwatmaklokswamivarta

आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर निघण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज– संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ  • जिल्हा यंत्रणेचा आढावा

जनतेला शासकीय सेवांचा लाभ वेळेत मिळेल याची खबरदारी घ्या – मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

सर्वांसाठी घरे हे ध्येय साकारण्यासाठी प्रत्येक मंडळात क्लस्टर विकसित करु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याची (PCPNDT) जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी