vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार- गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार- गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांमार्फत गर्दीच्या व सार्वजनिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी नियमित पेट्रोलिंग सुरू आहे. अशा ठिकाणी पोलीस बळ वाढवून देण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे यांनी भुसावळ शहरात 10 जानेवारी रोजी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ.भोयर म्हणाले, याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे येथे दि. 10 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अचानकपणे ऑलआऊट कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर नियमित लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सराईत गुन्हेगार व आरोपींवर मोठ्याप्रमाणावर एमपीडीए, हद्दपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. मुक्ताईनगर येथील घटनेच्या अनुषंगाने गुन्हेगारावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे

संबंधित पोस्ट

दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा; महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त विशेष उपक्रमांमधून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये जनजागृती

राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल-देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकार संपूर्ण अरवली पर्वतरांगेचे रक्षण करेल; खाण भाडेपट्टीने दिली जाणार नाहीत; संरक्षित क्षेत्राचा विस्तार केला जाणार

vishwatmaklokswamivarta

रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले व्हावे – मंत्री ॲड. आशिष शेलार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाची पाहणी..

जालना-नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांच्या समृध्दी महामार्गाच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta