vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, प्रतिनिधी : ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ साठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकर, दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य अॅड उज्ज्वल निकम, श्री. वासुदेव कामत, श्री.गो. ब. देगूलकर, डॉ शशिकला वंजारी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणा-या तसेच त्याव्दारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीला देण्यात येतो. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024’ पुरस्कारासाठी शासनाला प्राप्त शिफारस प्रस्तावापैकी एकाची निवड करणे अत्यंत कठीण काम आहे. पुरस्कार निवड समिती सदस्यांनी सुचविलेली नावे लक्षात घेवून असून लवकरच हे पुरस्कार सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून जाहीर करण्यात येतील.

   सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबाबत सादरीकरण केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य यांनी पुरस्कारासाठी निवड याबाबत मते मांडली.

0000

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन**जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलचे तसेच ‘आला रे आला… राज्य महोत्सव आला…’ या गीताचे लोकार्पण

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची शासनाची भूमिका- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका ‘एक्स-आयएनएस गुलदार’ समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित..महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प…

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन