vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये केले. सदस्य शशिकांत शिंदे यांनी टोरेस घोटाळा प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते,

 जादा व्याज देणाऱ्या ९९ टक्के योजना या फसव्या असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कोणीही अशा प्रकारे जादा व्याज देऊ शकत नाही. बँकेच्या व्याजदरापेक्षा दोन ते चार टक्के जास्ती व्याज दिले जाणे शक्य आहे. पण त्यापेक्षा जास्त किंवा भरघोस व्याज देणे कोणालाही शक्य होत नाही. त्यामुळे असे जादा व्याजाचे अमिष देणाऱ्या योजना फसव्याच असतात. त्यांच्या अमिषाला जनतेने बळी पडू नये आणि अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नये असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

 तसेच प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, राज्यातील गुंतवणूक तसेच अर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांवर देखरेखीसाठी इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येत आहे. तसेच टोरेस प्रकरणी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

९ फेब्रुवारी – उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस निश्चयाचा महामेरू..बहुत जनांसी आधारु..

vishwatmaklokswamivarta

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज राज्य सरकारने 1 एप्रिल पासून सार्‍यांनाच फास्टटॅग (Fastag) बंधनकारक

कानडवाडी येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..

सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta