vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी- उद्योग मंत्री उदय सामंत

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी- उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबई, प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामांच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल..या समितीच्या अहवालानुसार, जे शासकीय अधिकारी यात दोषी आढळतील, अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल,” असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधान परिषद सदस्य सर्वश्री सचिन अहिर, ॲड.अनिल परब, भाई जगताप, प्रवीण दरेकर, सुनील शिंदे यांनी मुंबईतील अनधिकृत बांधकामासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले की, सध्या आठ प्रभागांमध्ये ७,९५१ अनधिकृत बांधकामे आहेत, ज्यामध्ये १,२११ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. याशिवाय, २,०१५ बांधकामांसंदर्भात खटले चालू आहेत. अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात शासन गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

000000

संबंधित पोस्ट

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिनात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी

महसुल खात्याचे क्रांतीकारी निर्णय जिल्हास्तरावर त्वरीत राबविण्यात यावे.. महसुलमंत्री तथा पालकमंत्री अमरावती श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.

कन्नड येथे नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक सरसकट पंचनामे करा-पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

अनुकंपा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना हरकत/आक्षेप अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सव विशेष वृत्तमालिका भाग 2 महिला व बालविकास विभागाच्या योजनांतून निवारा, आर्थिक मदत व कायदेशीर मदतीचा आधार महत्त्वाचे संपर्क क्रमांक वुमन हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 181 समस्याग्रस्त बालकांच्या मदतीसाठी टोल फ्री हेल्प लाईन 1098

vishwatmaklokswamivarta

लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*