vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

म्हाडा प्रमाणे एसआरएमध्येदेखील स्वयंपुनर्विकास योजना- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

म्हाडा प्रमाणे एसआरएमध्येदेखील स्वयंपुनर्विकास योजना- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई, प्रतिनिधी : म्हाडामध्ये ज्या प्रमाणे स्वंयपुनर्विकास योजना राबवण्यात येत आहे आणि त्यासाठी मुंबई बँकेचे साहाय्य घेतले जात आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणामध्येही स्वयंपुनर्विकास योजना आणण्याचे शासानाच्या विचाराधीन असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.
म.वि.प. नियम 260 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मंत्री भोयर बोलत होते.  मुंबई गृहनिर्माण क्षेत्रामधील सदनिकांचे दर जास्त असल्याची बाब लक्षात आल्यानंतर हे दर कमी करून फेर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेडीरेकनरच्या 110 टक्के हे दर असतात. त्याप्रमाणे दर ठरवण्यात आले आहेत. नेहरूनगर व टिळकनगर या म्हाडा वसाहतीतील 301 इमारतींपैकी 182 इमारतींच्या पुनर्विकासाकरीता म्हाडा मार्फत मंजुरी प्रदान करण्यात आली असून 49 इमारतींना भोगवट प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले आहेत. तसेच याठिकाणच्या पोलीस वसाहतींचा पुनर्विकासही म्हाडामार्फत करण्यास गृह विभागाने संमती दर्शवली आहे. मुंबईतील धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडीटचे काम सुरू असल्याची माहितीही मंत्री भोयर यांनी यावेळी सभागृहास दिली.
0000

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल, मल्लखांब स्पर्धांच्या आयोजनाचा सांगलीला मान- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला नियोजनाचा आढावा- 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा- स्पर्धांचे दर्जेदार आयोजन करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत टास्क फोर्सने अभ्यास दौरा करून अहवाल द्यावा- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी:सोलापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड प्रकरणी चौकशी करून कारवाई- वनमंत्री गणेश नाईक

पनवेल महानगरपालिका आणि इनरव्हिल क्लब आफॅ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रम

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही

vishwatmaklokswamivarta

इंडिगो आणखी अडचणीत– 5 वर्षांपूर्वीचं कोट्यवधींचं प्रकरण समोर, नोटिस जारी

vishwatmaklokswamivarta