vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विधानपरिषद कामकाज :राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी- उद्योग मंत्री उदय सामंत

विधानपरिषद कामकाज :राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी- उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील सर्वच महानगर पालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.म.वि.प. नियम 260 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना श्री. सामंत बोलत होते.

उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, धारावी, मालाड, वर्सोवा, घाटकोपर, भांडुप, वांद्रे आणि वरळी येथे नव्याने एसटीपी प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर महानगरपालिकांमध्येही यासंदर्भातील कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. नवी मुंबईचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झालेला नाही. जी शहर समाविष्ट आहेत, त्यासाठी शासनाकडून तब्बल 6000 कोटीपेक्षा अधिक निधी वितरित करण्यात आला आहे, या प्रकल्पांतर्गत 9000 कोटी रुपयांचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

सिडकोच्या घर वितरणासंदर्भात उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, सिडको आणि म्हाडाच्या लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. ही प्रक्रिया संगणकीय पद्धतीने आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पार पाडली जाते. यामध्ये कोणीही गोंधळ घालण्याची शक्यता नाही. 21 हजार 399 अर्जदारांमध्ये पारदर्शक सोडतीद्वारे 19 हजार 518 घरांचे वितरण करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात ते म्हणाले, निवडणुकांच्या तारखा सर्वोच्च कोर्टाच्या निर्देशानुसार ठरवल्या जातील. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश येताच पुढील पावले उचलेली जातील असे श्री सामंत यांनी सांगितले.0000

संबंधित पोस्ट

स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

स्मार्ट गव्हर्नन्स व आदिवासी सशक्तीकरण या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठीकृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी सामंजस्य करार महत्त्वाचा ठरणार- कोकण महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीकोंकण विभागीय आयुक्त कार्यालय व विजयभूमी विद्यापीठ यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी सामंजस्य करार

शाळा वाचविण्यासाठी हुतात्मा चौक ते महापालिका कार्यालय पर्यंतचा सामाजिक कार्यकर्ते पालकांचा महामोर्चा 

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन… जिल्हा प्रशासनाद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसिद्धी मोहीम सुरु

तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी-पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत