vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यपालांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार प्रदान

राज्यपालांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार प्रदान

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विविध वैयक्तिक, सांघिक तसेच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

एमसीए क्लब बीकेसी मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक तसेच सर्वोच्च समितीचे सदस्य, आजी माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक व प्रशासक उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते एमआयजी क्रिकेट क्लबचे संस्थापक प्रविण बर्वे, प्रशासक प्रा. रत्नाकर शेट्टी व माजी कर्णधार डायना एडलजी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचे चौथे जीवनगौरव पुरस्कार विजेते दिलीप वेंगसरकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.यावेळी दिवंगत क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांच्या कुटुंबीयांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते २०२३ रणजी चषक विजेत्या संघाचा तसेच वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी चषक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

0000000

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट – उपमुख्यमंत्री

पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता या भविष्यवेधी संकल्पनेची निवड योग्य- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ‘महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन’चे उद्घाटन

भारतीय सशस्त्र सैन्या दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी..

युवकांसाठी ‘अमृत चे’ ड्रोन प्रशिक्षण; परवानाही मिळणार खुल्या प्रवर्गाच्या आर्थिक दुर्बल घटकातील युवकांनी अर्ज करावेत

प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना- २०२५’ चे उद्घाटन व नवीन इलेक्ट्रिक बस लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहचविण्यासह देशाची एकता, अखंडता मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री