vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांना 7 एप्रिल पर्यंत कर्ज फॉर्म भरण्याचे आवाहन..

आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांना 7 एप्रिल पर्यंत कर्ज फॉर्म भरण्याचे आवाहन..

        सांगली, प्रतिनिधी : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत एन.एस.टी.एफ.डी.सी. नवी दिल्ली तथा राज्य शासन पुरस्कृत कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. शबरी शाखा कार्यालय, जुन्नर कार्यक्षेत्रात येणारे पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यामधील आदिवासी लाभार्थींकरिता कर्ज योजना राबविण्यासाठी सन 2024-25 साठी राज्य शासन पुरस्कृत योजना व एन.एस.टी.एफ.डी.सी. कर्ज योजनेसाठी लक्षांक प्राप्त झाले आहेत. या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी www.mahashabari.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून दि. 7 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन कर्ज फॉर्म भरावेत, असे आवाहन महामंडळाचे शाखा व्यवस्थापक रा. भ. पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

  राज्य शासन पुरस्कृत योजनेंतर्गत स्वयंसहायता बचतगट, ऑटो वर्क शॉप / स्पेअर पार्ट, ऑटो रिक्षा/ मालवाहु रिक्षा व वाहन व्यवसाय यासाठी प्रत्येकी 4 असा एकूण 16 लक्षांक प्राप्त आहे. एन.एस.टी.एफ.डी.सी. कर्ज योजनेंतर्गत स्वयंसहायता बचतगटासाठी 10, ऑटो वर्क शॉप /स्पेअर पार्ट 8, लहान उद्योग व्यवसाय 17, ऑटो रिक्षा/मालवाहू रिक्षा एक असा एकूण 39 लक्षांक प्राप्त झाला आहे. कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी संपर्क करा 02132-295473

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय एकता ग्रूप द्वारा संचालित एकता कोचिंग क्लास याचा गॅदरिंगसमारोह चा उद्घाटन माजी राज्य मंत्री व जालना जिल्ह्याचे लोक प्रिय आमदारअर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते.

vishwatmaklokswamivarta

नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांच्या आरक्षणाची घोषणा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील शूरवीराच्या शौर्याचा गौरव: पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च