vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात 4 एप्रिल रोजी ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण भरती मेळावा’ चे आयोजन· मेळाव्यामध्ये 204 रिक्त पदांसाठी होणार भरती..

जिल्ह्यात 4 एप्रिल रोजी ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण भरती मेळावा’ चे आयोजन· मेळाव्यामध्ये 204 रिक्त पदांसाठी होणार भरती..

 

जालना, प्रतिनिधी): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अणि मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 4 एप्रिल, 2025 रोजी मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय, सिरसवाडी रोड, रेल्वे उड्डाण पुलाशेजारी, जालना येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात दहावी/बारावी/आय.टी.आय./बी.ए./बी.कॉम/बी.एससी/ डिप्लोमो/डिप्लोमा ॲग्री/बी.एस.सी. ॲग्री/एम.एस.सी. ॲग्री/एम.बी.ए. इत्यादी पात्रता धारक नोकर इच्छुक उमेदवारासाठी एकुण 204 रिक्त पदे उपलब्ध असून, मुलाखतीसाठी विविध 8 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

 या रोजगार मेळाव्या मध्ये प्रीम सोल्यूशन प्रा. लि. (सलाम किसान) जालना यांची 18 पदे, प्रीम सोल्यूशन प्रा. लि. जालना यांची 22 पदे, कलश सीड्स प्रा. लि. जालना यांची 25 पदे, एस.बी.आई इन्शुरेंस कंपनी लि. जालना यांची 10 पदे, राजुरी स्टील्स टी एम टी बार्स प्रा. लि. जालना यांची 20 पदे, प्रथम एजुकेशन फाउंडेशन छ. संभाजीनगर यांची 60 पदे, रिध्दी सिध्दी सर्व्हिसेस, जालना यांची 29 पदे, भाग्य लक्ष्मी रोलींग मिल्स प्रा. लि. जालना यांची 20 पदे, असे एकूण 204 रिक्त पदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 8 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असुन, पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

या सुवर्ण संधीचा रोजगार इच्छुक जिल्यातील जास्तीत-जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि किमान पाच प्रतीत रिझ्युमे/बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड/सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास

तसेच www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉबफेअर टॅबवर क्लिक करुन पंडीत दीनदयाळ उपाध्यायरोजगार मेळाव्यामध्ये जाऊन पात्रते प्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्त पदांसाठी अ‍ॅप्लाय करावे, यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी व व्हॉटस्अप क्रमांक 02482-299033 वर संपर्क करावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गणेश चिमणकर यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक,रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करा…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईचे आदेश- मंत्री उदय सामंत

जम्मू काश्मीरच्या पहालगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाने श्रध्दांजली सभा आणि जोरदार तीव्र स्वरूपात निदर्शने केले

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती…

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाचे ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर..

राज्यातील इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा..