vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार…

नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार…

राज्य प्रतिनिधी-राज्यातील नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांच्या नावावर वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार, महानगर प्रदेशातील सर्व भारमुक्त शासकीय जमिनी राज्य शासनाच्या अटी व शर्तींनुसार प्राधिकरणांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत. संबंधित प्राधिकरण या जमिनींचा उपयोग मंजूर प्रादेशिक किंवा विकास योजनेनुसार पायाभूत सुविधांसाठी निधी उभारण्याच्या स्रोत म्हणून करू शकतील.

प्राधिकरणांकडे वर्ग होणाऱ्या जमिनींची विल्हेवाट विहित नियमावलीनुसार करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, राज्य शासनाच्या मान्यतेने प्रत्येक प्राधिकरणानाला स्वतंत्र जमीन विल्हेवाट नियमावली तत्काळ तयार करावी लागणार आहे.

या जमिनींच्या वापराबाबत महसूल व वन विभागाच्या स्तरावर स्वतंत्र अभिलेख ठेवले जातील आणि त्याचे डिजिटायझेशन केले जाणार आहे.

गायरान, गुरचरण, देवस्थान किंवा वन जमिनींचा समावेश असल्यास, त्या जमिनींवर सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच कार्यवाही करावी लागेल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.तसेच, जर हस्तांतरित होणाऱ्या जमिनी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेच्या ताब्यात असतील, तर त्यांचा विकास करण्याआधी संबंधित संस्थेची परवानगी किंवा ठराव घेणे प्राधिकरणांना अनिवार्य राहील.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महानगर प्रदेश विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीसाठी निधी उभारण्यास प्राधिकरणांना मोठा आधार मिळणार आहे, यातून विकास कामांना वेग येणार

00000–0—

संबंधित पोस्ट

शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक- मंत्री छगन भुजबळ· बंद केंद्रे लवकरच सुरू करणार

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी गती…

vishwatmaklokswamivarta

स्वामित्व योजनेमुळे नागरिकांना दिलासा; मिळकतीचे आपसातील वाद संपुष्टात येतील – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडल्याची भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

vishwatmaklokswamivarta

गोव्याच्या अर्पोरा परिसरातील ‘बर्च बाय रोमियो लेन्स- 25 पैकी 23 गुदमरुन दगावले, आग लागल्यावर कर्मचारी का पळाले नाहीत? मृतांमध्ये दोघे महाराष्ट्राचे,  यादी

vishwatmaklokswamivarta